Cow Smuggling : कत्तलीसाठी दुभत्या गायींची अवैध वाहतूक; गाडी पलटी झाली अन् समोर आली धक्कादायक बाब..

गायी कमी जागेमध्ये निर्दयपणे कोंबून भरलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळल्या.
Cow Smuggling
Cow Smugglingesakal
Summary

अंधाराचा फायदा घेऊन गायींनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता. पोलिसांनी हे वाहन जप्त करून वाहनातील तिन्ही गायींच्या चारापाण्याची सोय पुसेगाव पोलिस ठाण्याच्या आवारातच केली.

पुसेगाव/बुध : डिस्कळ-चिंचणी मार्गावरील डिस्कळ (ता. खटाव) हद्दीत गोवंश (Cow) तस्करी करणारे वाहन नाल्यात पलटी झाले. या अपघातामुळे प्रवासी वाहनातून कत्तलीसाठी अवैध गोवंश वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले. तसेच या अपघातामुळे का होईना; पण तीन दुभत्या गायींचे प्राण वाचले.

शुक्रवारी (ता. १२) रात्री ११ वाजण्‍याच्‍या सुमारास गायींना कतलीसाठी घेऊन जाणारी वाहन क्रमांक (एमएच १२ सीवाय ५६८७) हे डिस्कळ गावच्या हद्दीतील डिस्कळ-चिंचणी रोडवरील गोडसे वस्ती येथील सयाजी बाबूराव गोडसे यांच्या गोठ्याजवळील नाल्यात चालकाचे नियंत्रण सुटून एका बाजूस पलटी झाली. बातमीदारामार्फत या घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी (Pusegaon Police) घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.

Cow Smuggling
Karnataka Result : 'बेळगाव'वर काँग्रेस हायकमांड होणार मेहरबान; 'या' बड्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

यावेळी प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनात एक देशी गाय, एक गीर जातीची गाय, एक जर्सी गाय अशा एकूण तीन गायी कमी जागेमध्ये निर्दयपणे कोंबून भरलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळल्या. तिन्ही गायींचे चारी पाय व तोंड रस्सीने बांधल्याने या गायी जखमी व अशक्त झाल्या होत्या. पोलिसांनी तातडीने स्थानिकांच्या मदतीने या गायींना बाहेर काढून प्राथमिक उपचार केले. कतलीसाठी नेण्यात येणाऱ्या या गायी दुभत्या असल्याचे भयाण वास्तव यावेळी समोर आले.

Cow Smuggling
Education Department : शिक्षण विभागाचा 'खेळखंडोबा'; रिक्त पदं भरण्याबाबत शासनाची डोळेझाक भूमिका

दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन गायींनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता. पोलिसांनी हे वाहन जप्त करून वाहनातील तिन्ही गायींच्या चारापाण्याची सोय पुसेगाव पोलिस ठाण्याच्या आवारातच केली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विलास घोरपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आनंदा गंबरे हे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com