Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: आव्हाडांच्या रामावरील विधानाचा अजितदादा गटाकडून निषेध; आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन अजित पवार गट आक्रमक झाल्याचा पहायला मिळाला.

ठाण्यात या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत आव्हाडांचा निषेध नोंदवला. कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं. (Ajit Pawar group of NCP protests against statement on Ram by Jitendra Awhad)

काय म्हणाले होते आव्हाड?

आव्हाड कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, "तुम्ही इतिहास वाचत नाही, मनात ठेवत नाही. राजकारणात आपण वाहत जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. (Latest Marathi News)

तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आज आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श आहे राम शाकाहारी नव्हता मांसाहारी होता. १४ वर्षे जंगलात राहणारा माणूस शाकाहार शोधायला कुठं जाणार? असा सवालही त्यांनी केला"

आव्हाडांच्या घरासमोर अजितदादा गटाचं आंदोलन

दरम्यान, अजितदादा गटानं जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तसेच जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध केला. विरेंद्र वाघमारे या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यानं हा निषेध नोंदवला यावेळी त्यांच्या हातात श्रीरामाची प्रतिमा होती. (Marathi Tajya Batmya)

यावेळी आव्हाडांच्या घराबाहेर ते श्रीरामाची आरती देखील करणार होते. पण पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत वाघमारे यांना पोलिसांच्या वाहनात बसवून ताब्यात घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT