ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र घडला अन् राज्यपाल...; अजित पवार संतप्त

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे

रुपेश नामदास

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राजकीय स्तरातून टीका करण्यात येत आहे. दरम्यान अशातच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागितली, असं म्हणत सुधांशू त्रिवेदींनी म्हंटलं आहे. यावर राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. (Ajit Pawar Maharashtra governor Bhagat Singh Koshyari Chhatrapati Shivaji Maharaj)

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे. दरम्यान आता राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यपलांना सद्‌बुद्धी लाभो, अशी प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्विट करत राज्यापलांना सुनावलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत.

राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील,

महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

SCROLL FOR NEXT