Bhagat Singh Koshyari: राज्यपालांनी केलेले विधानावर अखेर भाजपची प्रतिक्रिया; म्हटलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat sinh Koshyari

Bhagat Singh Koshyari: राज्यपालांनी केलेले विधानावर अखेर भाजपची प्रतिक्रिया; म्हटलं...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राजकीय स्तरातून टीका करण्यात येत आहे. दरम्यान अशातच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागितली, असं म्हणत सुधांशू त्रिवेदींनी म्हंटलं आहे. यावर राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे.

दरम्यान भाजपकडून यासंबधी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. ट्विटमद्धे संजय कुटे म्हणतात की, "आम्ही राज्यपालांच्या या वक्तव्याशी कदापि सहमत नसून तीव्र शब्दात याचा निषेध करीत आहोत. त्यांचे राज्यातील वारंवार होत असलेले हे अशोभनीय वर्तन अयोग्य आहे. याबद्दल मा.पंतप्रधान व इतर पक्षश्रेष्ठीनच्या लक्षात ही बाब नक्कीच आनल्या जाईल." अशा शब्दात भाजप राज्यपालांच्या मतअशी सहमत नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Sudhanshu Trivedi: “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली” भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

तर पुढच्या ट्विटमध्ये संजय कुटे म्हणतात की, "महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि चिर:काल राहणार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विधान हे व्यक्तिगत असू शकते पण ते महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतिला शोभेल असे नक्कीच नाही असेही