alcohol sakal
महाराष्ट्र बातम्या

काजू, मोहाच्या दारूला विदेशीचा दर्जा; वाचा मंत्रिमंडळ निर्णय

मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची इलाईट आणि सुपर प्रिमियम अशा दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारूला आता यापुढे विदेशी (Foreign Liquor) दारूचा दर्जा दिला जाणार आहे. याबाबत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या (Maharshatra Cabinet Decision) बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयापूर्वी या प्रकारच्या दारूला देशी दारूचा (Deshi Alcohol) दर्जा देण्यात आला होता. मात्र, आजच्या निर्णयानंतर आता काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनवलेल्या बनलेल्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्यात आला आहे. त्याशिवाय मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची इलाईट आणि सुपर प्रिमियम अशा दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे जी छोटी दुकान आहेत ते दुकानदार आता दुकानाचा विस्तार करून मद्य विक्रीची कक्षा वाढवू शकणार आहेत. (Cashew Moha Flower Alcohol )

इलाईट गट 600 चौरस फुटांपर्यंत विस्तार करु शकणार आहेत. तर, सुपर प्रिमियम गटातील दुकानदार 600 चौरस फुटांच्यावरदेखील विस्तार करु शकणार आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत महसूल वाढीसाठी एफएल-2 परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारूची अपेक्षित विक्री होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता यापासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानांत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना त्यांच्या दुकानाचा विस्तार करुन मद्यविक्रीची कक्षा वाढवता येणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल असा राज्य सरकारचा मानस मानस आहे. याशिवाय फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन आणि त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठीही धोरण आखण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price : LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर; कुठे स्वस्त, कुठे सर्वाधिक महाग? सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना धक्का

Maharashtra Weather: ऑगस्टमध्ये पावसाची पाठ, आता सप्टेंबरचीही चिंता! मराठवाडा-विदर्भावर दुष्काळाचे सावट

Paneer Bhurji Toast Recipe: मुलं डबा पूर्ण संपवतील! कमी वेळात बनवा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट; रेसिपी आहे अगदी सोपी!

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर पुण्यात खलबतं! फडणवीसांच्या उपस्थितीत उपसमितीची बैठक; १२ सप्टेंबरपूर्वी तोडगा काढण्यासाठी सरकारची धावपळ

Rajgurunagar Crime : बहिणीशी न बोलल्याच्या रागातून पत्नीचा खून; मुलावरही चाकूने केला हल्ला, पती फरार

SCROLL FOR NEXT