

Advance Tax Planning
esakal
प्राप्तिकर भरायचा म्हटले, की अनेकांच्या डोळ्यांसमोर प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख येते. मात्र, प्राप्तिकर भरण्याची जबाबदारी केवळ वर्षअखेरीस किंवा विवरणपत्र भरताना पूर्ण होत नाही. उत्पन्न मिळत असतानाच त्यावर देय असलेला कर टप्प्याटप्प्याने भरण्याची म्हणजेच आगाऊ प्राप्तिकर (ॲडव्हान्स टॅक्स) व्यवस्थाही आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातून मालक दरमहा करकपात करत असल्याने त्यांना आगाऊ प्राप्तिकर भरण्याची गरज अनेकदा पडत नाही. परंतु, पगाराव्यतिरिक्त घरभाडे, बँकेतील ठेवींवरील व्याज, व्यवसायाचे उत्पन्न, व्यावसायिक उत्पन्न किंवा भांडवली लाभातून उत्पन्न मिळत असेल, तर करदात्याने आपल्या एकूण करदायित्वाचा अंदाज घेणे आवश्यक ठरते.