Amit Thackeray latest marathi news esakal
महाराष्ट्र बातम्या

वडिलांमुळे राजकारणात, अन्यथा कधीच आलो नसतो; 'राज'पुत्र अमित ठाकरेंचं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यापासून प्रचंड उलथापालथ सुरू आहे. कोणाचा कुणाला मागमूस राहिला नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला चालली, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर आम्ही कसे बरोबर आहोत हे पटवून द्यायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे दिली आहे. अमित ठाकरे देखील राजकारणात सक्रीय आहेत. मात्र आज आपण केवळ वडिलांमुळे राजकारणात असल्याचं विधान अमित ठाकरे यांनी केलं आहे. त्यांचं हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे.

अमित ठाकरे म्हणाले की, सध्याच्या राजकारणाची स्थिती भयावह आहे. मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलोच नसतो. राजकारणाची सध्याची स्थिती पाहून मला राजकारणात यावचं वाटलं नसतं. केवळ राजसाहेबांनी संधी दिल्याने मी राजकारणात आल्याचं त्यांनी नमूद केलं.

सध्या राज्याच्या राजकारणातील घडामोडी सर्वसामान्यांना न पटणाऱ्या आहेत. एकाच दिवशी दोन मोठमोठ्या सभा घेणे, मात्र त्यात सर्वसामान्यांसाठी काहीही विधायक नसने हे महाराष्ट्रातील जनतेसाठी क्लेशदायक आहे. दररोज एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. त्यामुळे राजकारण नकोनकोस झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Latest Marathi News Live Update : नितीश कुमार हे काही महिन्यांसाठीच मुख्यमंत्री होतील हे मी आधीच सांगितले होते- संजय राऊत

Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Post Holi Detox: होळीनंतर शरीर डिटॉक्ससाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT