ST Bus Fare Hike: दिवाळीत गावी जाणे महागले! 'एसटी'कडून भाडेवाढ जाहीर!

Shivshahi-Bus
Shivshahi-Bussakal media
Updated on

मुंबई: दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळाने भाडेवाढ जाहीर केली आहे, त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशावर भार वाढणार आहे. एसटी महामंडळाने २० ऑक्टोबरपासून पाच रुपयांपासून ते ७५ रुपयांपर्यंतची दरवाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दिवाळीच्या सणानिमीत्त एसटी महामंडळाकडून बस तिकीटांचे दर वाढवण्यात आले आहेत, ही दरवाढ आज जाहीर करण्यात आली असून मागच्या काही दिवसात एसटीचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता हा हंगामी निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. २० ऑक्टोबर रात्री १२ वाजल्यापासून ही भाडेवाढ राज्यभर लागू होणार आहे.

एसटीने ५ ते ७४ रुपयांपर्यंतची दरवाढ केली असून दादर-स्वारगेट मार्गावर सध्या २२५ रुपये दर आहे तो या काळात २६० रुपये असणार आहे. तर शिवशाही गाडीसाठी ३५० असलेल्या दरात ३८५ रुपये इतकी वाढ केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Shivshahi-Bus
Maharashtra Politics: आणखी एक आमदार शिंदे गटाच्या गळाला? सुरक्षा वाढवल्याने चर्चेला उधाण

या गाड्या वगळल्या जाणार

भाडेवाढ करताना शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांना ही भाडेवाढ करताना त्यामुन वगळण्यात आले आहे. या गाड्या सोडून बाकीच्या साधी गाडी, निम आराम गाडी आणि शिवशाही या गाड्यांना ही भाडेवाढ लागू असणार आहे. तसेच दिवाळीसाठी एसटीच्या १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत या गाड्या धावणार आहेत.

Shivshahi-Bus
Heavy Rain in Mumbai: मुंबई शहर, उपनगरांसह ठाण्यात मुसळधार पाऊस! अंधारून आल्याने वाहतूकही मंदावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com