Dr. Amol Kolhe esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe : मी स्टार प्रचारक, हे आत्ताच कळलं; पोटनिवडणुकीबाबत कोल्हेंचं विधान

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असतानाच चिंचवडमध्येही चुरस निर्माण झाली आहे. त्यातच या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा आहे.

अमोल कोल्हे पोटनिवडणुकीबाबत म्हणाले की, या सगळ्या गोष्टी सुरू असताना मी दिल्लीत होतो. राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य आहे. अजित पवार आणि इतर नेत्यांनी निर्णय घेतल्यावर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय बोलणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान कसबा, चिंचवडमध्ये सभा घेण्याबाबत मला माहिती नाही. मी स्टार प्रचारक आहे, हे मला आत्ताच कळलं, अस कोल्हे म्हणाले. तसेच भाजप प्रवेशाबाबत कोल्हे म्हणाले की, लोकशाहीतमध्ये राजकारणाचा पोत बदलत चालला आहे. संसदेतील भाषणाबाबत अजूनही लोकांना प्रश्न पडत असेल तर माझे संसदेतील पूर्ण भाषण ऐकावे. माझ्या संसदेच्या भाषणात "कभी खुशी कभी गम" आहे का, हे तुम्हाला कळेल, असंही कोल्हे यांनी नमूद केलं.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हे म्हणाले की, मला त्याविषय़ी माहीत नाही. मी संसदेत होतो. दरम्यान आमचे नेते राज्याच्या सर्वोच्च पदावर बसणे ही कार्यकर्त्यांनी अपेक्षा आहे. त्यात काहीही गैर नाही, असंही कोल्हे यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT