Anna Hazare Hunger Strike Cancel sakal
महाराष्ट्र बातम्या

वाईनविक्री विरोधातील अण्णा हजारेंचं उपोषण मागे; 'हे' ठरलं कारण

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी काही वेळापूर्वी वाईनविक्रीविरोधातील स्वतःची भूमिका स्पष्ट केली होती. मी उद्यापासून उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण, ग्रामसभेत ठराव पास झाला असून अण्णांनी त्यांचं उपोषण (Anna Hazare Hunger Strike Against Wine Selling) तीन महिन्यांसाठी पुढे ढकललं आहे. याबाबत राळेगणसिद्धीचे माजी सरपंच डॉक्टर धनंजय पोटे यांनी माहिती दिली.

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे उद्या होणारे उपोषण मागे घेण्यात आले आहे. अण्णा हजारेंनी आंदोलन करू नये, असा निर्णय ग्राममसभेत एकमुखाने घेण्यात आला आहे. सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करावी की नाही? आणि अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसावं की नाही याबाबत ठराव मांडण्यासाठी ग्रामसभा झाली. या ठरावात सरकारने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये; असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अण्णांची तब्येत पाहता त्यांना उपोषण करू नये, असं पत्र लिहिण्यात आलं. त्यानंतर अण्णांनी पुढील ३ महिन्यांसाठी उपोषण स्थगित केलं.

सरकारने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री केली जाते, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल अण्णा हजारेंनी सरकारला केला होता. तसेच मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा नाही. मी ८४ वर्ष जगलो. आता राज्य सरकारच्या अशा निर्णयामुळे मला जगायची इच्छा नाही. तुमच्या सरकारला निरोप पोहोचवा, असं अण्णा हजारे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT