Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : विठ्ठलाला साकडं घालताना मुख्यमंत्री 'मविआ'वर बरसले; म्हणाले, पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं..

आषाढीनिमित्त शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विठुरायाकडं बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, असे साकडे घातले.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत सुरु आहे. मविआच्या काळात काम थांबली होती, ती आता आम्ही पूर्ण करत आहोत.

पंढरपूर : आषाढीनिमित्त शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विठुरायाकडं बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे मागितले.

तसेच महापूजेनंतर आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासह इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज आषाढीनिमित्त मला सहकुटुंब, शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मिळालं. त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

आषाढीनिमित्त पंढरपूरामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे. शासकीय महापूजा झाल्यानंतर तुम्ही विठुरायाकडे काय मागणं मागितलंत असा प्रश्न मला पत्रकारांनी विचारला. आता विठुरायाकडं काय मागणार, बळीराजाला चांगले दिवस येऊदेत, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊदेत. राज्यात पाऊस चांगला पडू दे. हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे.

राज्यातील सर्व घटक सुखी समाधानी झाले पाहिजे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत हाच आपला उद्देश आहे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस येऊ देत हेच मागणं मी विठुरायाकडे मागितलं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत सुरु आहे. मविआच्या काळात काम थांबली होती, ती आता आम्ही पूर्ण करत आहोत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्तम नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. वारकरी बंधूंनी सहकार्य केले त्यांचे मी आभारी आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT