hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bil  
महाराष्ट्र बातम्या

सदाभाऊ खोत यांना उधारी मागणाऱ्याला अटक; उधारीसाठी अडवला होता ताफा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करण्यासाठी ओळखले जातात. मात्र सदाभाऊ यांच्यावर काही महिन्यांपूर्वी हॉटेल चालकाच्या उधारीमुळे नामुष्की ओढावली होती. मात्र आता त्या हॉटेल चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अशोक शिंगारे असं त्या हॉटेल चालकाचे नाव आहे. (Sadabhau Khot news in Marathi)

हॉटेल चालक अशोक शिंगारे यांनी सदाभाऊ यांचा ताफा अडवून माझी उधारी द्या, अशी मागणी केली होती. त्यामुळे मोठा वाद झाला होता. शिंगारे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात आला होता. तर शिंगारे याने आपण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान शिंगारे याला अवैध वाळू उपसा प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, एक लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भादवि कलम ३७९ आणि कलम २१ अन्वये अशोक शिंगारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT