shivsena uddhav thackeray
shivsena uddhav thackeraySakal

आयुक्तांनी ७ कोटी रुपये कलेक्शन उद्धव ठाकरेंना पाठवलं; अपक्ष आमदाराचा खळबजनक आरोप

Published on

अमरावती  - अमरावतीचे राणा दाम्पत्य आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील टीका टीप्पणी थांबण्याचं नाव घेत नाहीये. खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यातच आज रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. (Uddhav Thackeray news in Marathi)

shivsena uddhav thackeray
Vedanta & Foxconn प्रकल्प गुजरातेत; महाराष्ट्राला काय होणार तोटा?

आमदार रवी राणा म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी अमरावतीतून अडीच वर्षांच्या काळात महिन्याला सुमारे सात कोटी रुपये कलेक्शन उद्धव ठाकरे यांना पाठवलं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडीला सोपविण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं राणा यांनी म्हटलं.

राणा पुढं म्हणाले की, दोन दिवसाआधी माझ्यावर, खासदार नवनीत राणा यांच्यासह आमच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे आणि आरती सिंह यांनी पैसे वसुलीचं जे अभियान चालवलं त्याची चौकशी सीआयडीला दिल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com