Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ayodhya Ram Mandir : निमंत्रण मिळालं!अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापनेला उद्धव ठाकरे जाणार का?

अयोध्येमध्ये २२ तारखेला नवीन राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना राम जन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे.

संतोष कानडे

मुंबईः अयोध्येमध्ये २२ तारखेला नवीन राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना राम जन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे.

काँग्रेस नेत्यांनी आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी अयोध्येतील सोहळ्याला जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

बाबरी मशीद पतनावेळी शिवसैनिकांची भूमिका महत्त्वाची होती, असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. आता राम मंदिर उभारलं असताना आणि सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना ठाकरे गट काय निर्णय घेणार? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने निमंत्रण मिळाल्याची माहिती येत आहे. उद्धव ठाकरेंचा त्याच दिवशी नाशिक दौरा आहे. ते काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यामुळे ते निमंत्रण स्वीकारतात की प्रतिनिधी पाठवतात, हे कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT