MLA Bacchu Kadu 
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: अखेर मनातलं ओठावर; 'मुख्यमंत्री बनायचंय' बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा

बच्चू कडूं अजूनही वेटिंगवर

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या पदरी काहीच न पडल्यामुळे अजूनही ते वेटिंगवर आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीचीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, त्यांच्या मनातली गोष्ट त्यांनी एका जाहीर सभेत बोलून दाखवली आहे.(Bacchu Kadu)

टी व्ही ९ ने दिलेल्या माहितीनुसार, 'मुख्यमंत्री बनायचंय अशी इच्छा बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाला बच्चू कडू उपस्थित होते.

काय म्हणाले बच्चू कडू?

'प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे, आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे, लोक आम्हाला म्हणाले गद्दारी केली, आम्ही काही गद्दारी केली नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे असे म्हणत "तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते तो हमे भी बनना है...."आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं.

यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रिपदावरील आपली आकांक्षा व्यक्त केली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT