Balasaheb Thackeray Death Anniversary Esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thackeray: CM शिंदेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेताच शिंपडले गोमूत्र

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज (गुरुवारी) दहावा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन स्मृती दिनानिमीत्त दर्शन घेतले. दरम्यान यावरून चांगलच राजकारण तापलं आहे. मात्र शिंदे येऊन गेल्याच्या अवघ्या काही वेळानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी तिथं गोमूत्र शिंपडलं आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

दरम्यान यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. त्यावर खासदार प्रतापराव जाधव यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले चक्क आदित्य ठाकरे वर निशाणा साधत पाहिले आदित्य यांच गोमूत्राने शुद्धीकरण करा अस धक्कादायक विधान खासदार जाधव यांनी केलं आहे त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांनी संबोधून सांगितले होते की खंजीर बाजूला ठेऊन बाळासाहेब यांच दर्शन घ्या. या वक्तव्याचा ही खासदार प्रतापराव जाधव यांनी समाचार घेत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तर उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच खंजीर खुपसला असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहे. आदित्य ठाकरे यांच शुद्धीकरण आणि उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला खासदार जाधव यांच्या या दोन वादग्रस्त 2 विधानांमुळे पुन्हा जोरदार प्रहार होण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे यांनी आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee Setback : उद्धव ठाकरेंपेक्षाही ममता बॅनर्जींना धक्का!, ८० पैकी ५९ आमदार साथ सोडणार; बंगालचे एकनाथ शिंदे कोण?

Mumbai News: पूरमुक्त मुंबईसाठी महापालिका सज्ज! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर लक्ष

Team India Coach: भारतीय संघात नव्या कोचची एन्ट्री! कोण आहेत गौतम गंभीरच्या टीममध्ये सामील झालेले नवीन सदस्य?

व्वा, काय व्यवस्था आहे! तरुणपणी परीक्षा दिली, पण सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतर आलं नियुक्तीपत्र, लोकसेवा आयोगाचा गोंधळ

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

SCROLL FOR NEXT