Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदित्य ठाकरेंनी दिले वचन, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackeray Death Anniversary

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदित्य ठाकरेंनी दिले वचन, म्हणाले...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून त्यांना अभिवादन करण्यात आलं आहे. दरम्यान, त्यांचे नातू आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त वचन दिले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. (Balasaheb Thackeray Death Anniversary Aaditya Thackeray tweet Shiv Sena maharashtra politics)

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी! अशा आशयाचे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिले आहे. त्यांचे हे ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला स्थापन केला. आधी मराठी माणसाची लढाई शिवसेनेने लढली त्यानंतर हिंदुत्वाची भूमिका घेतली. गर्व से कहों हे हम हिंदू है हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता.

मात्र २०१९ ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसोबत उद्धव ठाकरे गेले त्यामुळे आपली अडचण होते आहे. अनेक गोष्टींवर भूमिका घेता येत नाही अशा सगळ्या आरोपांच्या फैरी बंडखोर आमदारांनी झाडल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना हा पक्ष दुभंगला आहे.

राज्यातील सत्तातरनांतर आदित्य ठाकरे चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. कट्टर शिवसैनिके नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठे भगदाड पाडले. त्यामुळे पुन्हा पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.

सत्तातरनंतर आदित्य ठाकरे विविध रॅलीतून जनतेशी थेट संपर्क साधताना दिसत आहेत. पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामधून भाजप सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत.

'हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा. दगाबाजांना आता महाराष्ट्रात जागा नाही. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पद्धतीने बंडखोरांना धडा शिकवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेला नवसंजीवनी देण्यात यशस्वी होतील का? हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.