pankaja munde jyoti mete esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : ज्योती मेटे निवडणूक लढवण्यावर ठाम; शरद पवार गटाने तिकीट का नाकारलं? मेटे म्हणाल्या...

ज्योती मेटे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी मानसिकता आहे. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्याबाबत मी अंतिम निर्णय घेणार आहे.

संतोष कानडे

Jyoti Mete : बीड लोकसभेसाठी ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर मेटे ह्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी दाट शक्यता आहे.

बीडमध्ये विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये ज्योती मेटे ह्या निवडणूक लढवतील, असं बोललं जात होतं. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती.

ज्योती मेटे यांचं तिकीट निश्चित मानलं जात असताना काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. पक्ष सोनवणेंना तिकीट देणार की मेटेंना? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली.

दुसरीकडे ज्योती मेटे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी मानसिकता आहे. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्याबाबत मी अंतिम निर्णय घेणार आहे.

शरद पवार गटाने आपल्याला का नाकारलं? असं विचारलं असता त्या म्हणाल्या की, याबाबतचा अंदाज मी वर्तवण्यापेक्षा त्याच पक्षाने याचा खुलासा करण्याची गरज आहे. मी मात्र लोकसभा निवडणूक लढवणार आहे. याबाबत बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बीडमध्ये परिस्थिती काय?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरल्यानंतर मराठा मतदार प्रभावित झालेला आहे. मराठा आरक्षणचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर दिसून येणार आहे. भलेही जरांगेंकडून उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट झालेलं असलं तरी मतांवर परिणाम होणार आहे.

ज्योती मेटे ह्या मराठा आरक्षण लढ्याचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी आहेत. सुरुवातीपासूनच त्यांचं नाव मराठा उमेदवार म्हणून घेतलं जात होतं. परंतु मनोज जरांगेंनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मग शरद पवारांकडून मेटेंनी उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. शेवटी पवारांनी सोनवणेंना उमेदवारी दिली.

आता ज्योती मेटे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसं झालं तर पंकजा मुंडेंना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी जाणार नाही. बीडमध्ये कायम मराठा-वंजारा अशी मतांची विभागणी होते. मराठा मतं यावेळी मराठा उमेदवाराच्या मागे उभे राहतील, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT