Balochistan: पाकिस्तानात माणसाच्या जीवाला किंमत आहे की नाही? महिन्याभरात 'इतक्या' लोकांचे अपहरण

Forced Disappearance: बलुचिस्तानच्या लोकांना जाती-धर्माच्या आधारावर नरसंहाराचा सामना करावा लागत आहे, ज्यात अपहरण, हत्या, लष्करी कारवाया, सक्तीचे विस्थापन, आर्थिक दडपशाही अशा अत्याचारांचा समावेश आहे.
Balochistan forced disappearance
Balochistan forced disappearanceEsakal

Balochistan Forced Disappearance:

गेल्या वीस वर्षांपासून, बलुचिस्तानला नागरिकांच्या अपहरणाच्या समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे या प्रांतावर भीतीचे सावट पसरले आहे.

बलुचिस्तान पोस्टने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात, तब्बल 22 व्यक्तींचे अपहरण झाले आहे. तसेच अपहरण झालेल्या इतर 15 व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे. याचबरोबर अहरण झालेल्या तीन व्यक्तींचे मृतदेह अढळले आहेत.

पाकिस्तानातील द बलोच पोस्टनुसार, बलुच कार्यकर्ते आणि मानवाधिकार संघटनांनी सातत्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलांवर ते या अपहरण आणि बेकायदेशीर हत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तान सरकारकडून या आरोपांना नाकारण्यात आले असताना, बलुच कार्यकर्त्यांनी याबाबतचे अनेक पुरावे सादर केले आहेत.

Balochistan forced disappearance
Viral Video: आता युद्धातही AI! गाझावर हल्ले करण्यासाठी इस्त्रायलनं नेमकं काय केलं? धक्कादायक अहवाल समोर

द बलोच पोस्ट या वृत्तपत्राने या अपहरण प्रकरणाचा तपास केला. त्यानुसार मार्च 2024 मध्ये पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये अपहरणाची अनेक प्रकरणे समोर आली.

या अहवालात विविध भागांतील अपहरण प्रकरणांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे, ज्यात मास्तुंग, क्वेटा आणि झेहरी यांचाही समावेश आहे.

अलीकडेच, बलुच यक्जेहती समितीने मंगळवारी ईदच्या दिवशी बलुचिस्तानमध्ये बलुच नरसंहाराविरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

Balochistan forced disappearance
Taiwan Nurses : भूकंपामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं बाळांचं रक्षण; तैवानच्या रुग्णालयातील 'हिरकण्यां'चा व्हिडिओ व्हायरल

बलुचिस्तानच्या लोकांना जाती-धर्माच्या आधारावर पद्धतशीर नरसंहाराचा सामना करावा लागत आहे, ज्यात अपहरण, हत्या, लष्करी कारवाया, सक्तीचे विस्थापन, आर्थिक दडपशाही आणि इतर अत्याचारांचा समावेश आहे. बलुच यक्जेहती समितीने या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com