BJP leader Pankaja Munde 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : मराठी असल्याने मलाही मुंबईत नाकारलं होत घर; पंकजा मुंडेंनी सांगितला अनुभव

रवींद्र देशमुख

मुंबई - मुंबईतील मुलुंड भागात कार्यालयासाठी भाड्याने जागा घेण्यासाठी गेलेल्या मराठी तरुणीला `इथे महाराष्ट्रीयन अलाउड नाही`, असे म्हणत धक्कदाबुक्की केली. खुद्द महिलेनेच याबाबत सांगितले. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटल्या. त्यातच आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपला अनुभव सांगितला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, शासकीय बंगला सोडल्यानंतर मी मुंबईत घर शोधायला गेले, तेव्हा मलादेखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आलं होतं. मराठी लोकांना आमच्या भागात घर देत नाही, हे शब्द मीदेखील अनुभवले आहे,अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी असे प्रकार घडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

दरम्यान हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाषावाद, प्रांत या विषयावर मी कधी भाष्य करत नाही. परंतु सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन खिन्न होते. मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने जो व्हिडिओ टाकला तो संताप आणणारा आहे. राज्यात सध्या आरक्षणावरून वेगवेगळे समाज समोरासमोर येत आहेत, जाती-जातीमध्ये भांडणे सुरू झाल्याचं पंकजा यांनी म्हटलं.

एकीकडे सगळी सुबत्ता आहे, सोयी आहेत, गाड्या आहेत तरी समाजामध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे समाज वेगवेगळ्या रंगात वाटला गेला आहे, हिरवा, पिवळा, निळा, भगवा. कधी कधी वाटतं एका चक्रावर हे सगळे रंग एकत्र करून फिरवली तर त्यातून पांढरा रंग तयार होतो. पांढरा रंग हा शांततेच प्रतीक आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहून मन अस्वस्थ होतं, असंही पंकजा यांनी नमूद केलं.

मुंबईतील घटनेवर विविध राजकीय पक्षांनी संताप व्यक्त करत झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही ही घटना अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT