Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : मोठी बातमी ! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सुत्रांची माहिती

रवींद्र देशमुख

Mumbai News - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला होता. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. सरकारकडून सातत्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जरांगे अध्यादेशावर ठाम असल्याने सरकार हतबल झाले आहे. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विशेष विधेयक मांडण्याच्या विचारात आहे. अर्थात मराठा आरक्षणासाठी सरकार विधेयक आणणार अशी चर्चा सरकारच्या प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचं सुत्रांनी सांगितलं. तसेच अध्यादेश आणला तर टिकाणार नाही असंही सरकारचं मत असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्यासह बुधवारी आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. मात्र या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नव्हता. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठक होणार असून त्यात काही निर्णय होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT