Bhavana Gawli 
महाराष्ट्र बातम्या

Bhavana Gawli: भावना गवळी यांना मोठा धक्का! संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले

खासदार भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संस्थेवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाकडून गोठवण्यात आली आहेत

कार्तिक पुजारी

मुंबई- खासदार भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संस्थेवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाकडून गोठवण्यात आली आहेत. आयकर विभागाच्या नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. (Big shock to mp Bhavana Gawli The Income Tax Department froze the accounts of the organization)

भावना गवळी यांच्या संस्थेवर याआधी देखील छापे पडले होते. आयकर विभागाने त्यांना २९ डिसेंबरला नोटीस पाठवून ५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यांनी ८.२६ कोटी रुपये आयकर न भरल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून ते भरण्यास सांगण्यात आले होते. याप्रकरणी कोणतीही हालचाल करण्यात न आल्याने त्यांच्या संस्थेची खाती गोठवण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला.

भाजपवर आरोप?

भावना गवळी या शिंदे गटाच्या खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात यंदा रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. पण, सध्या शिवसेनेमध्ये फूट पडली असल्याने भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का? याबाबत शंका आहे. भावना गवळी यांच्यावर आयकर विभागाने कारवाई सुरु केली असल्याने पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी भाजपवर टीका केलीये. लोकसभेसाठी उमेदवार म्हणून भाजपला भावना गवळी नको आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येतीये, असा आरोप त्यांनी केलाय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT