Bihar Cm Nitish Kumar Meet Uddhav Thackeray And Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बिहारचे CM पवारांच्या भेटीला जाणार; 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग

धनश्री ओतारी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार हे येत्या चार दिवसांत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. (Bihar Cm Nitish Kumar Meet Uddhav Thackeray And Sharad Pawar)

भाजपाविरोधात एक मजबूत आघाडी बनवण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार हे येत्या चार दिवसांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत.

या बैठकीमध्ये ते उद्धव ठाकरे यांना देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी उभारण्यासाठीच्या विशेष बैठकीचे निमंत्रण देणार आहेत. मातोश्री'वर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या भेटीनंतर नितिश कुमार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांचा हा महाराष्ट्र दौरा विरोधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र मिळत असलेल्या माहितीप्रमाणे नितीश कुमार यांचं नाव चर्चेत आहे.

आपल्याला पंतप्रधान व्हायच नाही, तर मला विरोधकांची मजबूत मोट तयार करायची असल्याचं यापूर्वीच नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT