Maharashtra Politics : शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या घरी मोठी चोरी

शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या घरी मोठी चोरी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics

शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या घरी मोठी चोरी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (mla sanjay shirsat son siddhant shirsat tractor was stolen)

आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्या मालकीचा पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर चोरट्यांनी सातारा परिसरातून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे.

Maharashtra Politics
Sharad Pawar : शरद पवारांच्या निर्णयानंतर ठाकरेंचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे. हा ट्रॅक्टर त्यांनी ३ मे रोजी सायंकाळी सातारा परिसरातील तंत्रज्ञनगर येथे उभा करून ठेवला होता.

हा ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस हवालदार धुळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलीस खबरींच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांनी पाच लाख रुपये किमतीत तो विकत घेतला. एम एच २८ एफ.यु ८९२६ असा चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा नंबर आहे.

Maharashtra Politics
Weather Update: पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मोचा चक्रीवादळामुळे बदलणार हवामान

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक या चोरीच्या घटनांमुळे त्रस्त आहे. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची ओरड अनेक दिवसांपासून नागरिक करत आहेत. असे असताना आता थेट आमदार पुत्राच्या ट्रॅक्टरची चोरीला गेल्याने परिसरात चांगलीच खळपळ माजली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com