Maratha Reservation Manoj Jarange patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: 'मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही,ज्यांच्या नोंदी...'; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

कोणत्या कायद्यानुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार? असा सवाल देखील भाजपच्या नेत्याने उपस्थित केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको करण्यात येत होते. सरकारने मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी काही वेळ मागितला आहे. तर येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या, असा अल्टिमेटम जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून एक मोठं विधान केलं आहे.

'मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही', असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असंही महाजन यावेळी म्हणाले आहेत. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावर मनोज जरांगे पाटील आज दौऱ्यादरम्यान काय प्रतिक्रिया देणार? हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

'मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते. तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, हे मी त्यावेळीच स्टेजवरून सांगितलं होतं.'

'ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांची तपासणी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार घेईल. जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहे, त्यांना सरकार कुणबीचा दाखला देत आहे. पण कुठल्या कायद्यानुसार देणार? कुठल्या नियमानुसार देणार? हा देखील मोठा प्रश्न आहे', असंही गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि मनोज जरांगे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. याबाबत बोलताना महाजन म्हणाले की, 'असे काही नाही मी जरांगेंच्या उपोषणादरम्यान चार वेळा गेलो होतो. पाचव्या वेळी गेलो नाही कारण मी बाहेरगावी होतो. मराठ्यांना आरक्षण मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT