MP Dr.sujay vikhe patil sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेची साथ सोडणार नाही; भाजपा खासदार सुजय विखेंचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरुन ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय, असंही विखे म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात एकीकडे भाजपा आणि शिवसेनेत छत्तीसचा आकडा असताना नगरमध्ये दोन्ही पक्षांचं गुळपीठ असल्याचं दिसून येतंय. कारण ठरलंय भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांचं एक विधान. काहीही झालं तरी आपण शिवसेनेची साथ सोडणार नाही, असं विधान विखेंनी केलं आहे.

नगरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखे पाटील बोलत होते.नगरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी विखे म्हणाले की, मी खासदार म्हणून निवडून येण्यात इथल्या शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधातही बोललो नाही. माझं आजही हेच मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरुन ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे ठाकरेंनी वेळीच सावध व्हावं.

शिवसेनेला मदत करणार असल्याचं सांगत विखे म्हणाले की माझे काही कार्यकर्ते शिवसेनेते गेले, पण त्याची मला खंत नाही. फक्त पारनेर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातलच भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा शिवसेनेवर संकट येईळ, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. असं बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपाचा एकमेव खासदार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election : गोकुळमध्ये निवडूण आलेले महायुतीचे संचालक गावातच राहणार; अध्यक्ष निवडीत दगाफटका होणार का?, संचालकांकडून स्पष्टीकरण

MS Dhoni on IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही, डिसेंबरमध्ये निर्णय घेणार; महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं चित्र, तेव्हा असं नेमकं काय घडणार?

Crime News: दहा हजारांचे कर्ज, ७५ हजारांची मागणी; मायच्या काळजाचा तुकडा हरपला!

Bay of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाचे संकेत; राज्यात पावसाचा अलर्ट, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

New Zealand T20I Squad Update: सलग दोन पराभव अन् न्यूझीलंड संघात उलथापालथ; भारताला हरवण्यासाठी धडाधड निर्णय

SCROLL FOR NEXT