Breaking News: Agriculture Minister Chaudhary Anna's visit to Ralegan Siddhi 
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग न्यूज ः केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णांच्या भेटीला राळेगणसिद्धीत, चर्चेची फेरी बंद खोलीत

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : शेतक-यांच्या प्रश्नी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या शनिवार (ता. ३० जानेवारी)पासून उपोषणास बसणार आहेत.त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी सव्वातीन वाजता राळेगण सिद्धीत दाखल झाले आहेत. हजारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बंद खोलीत चर्चेला प्रारंभ केला आहे.

हजारे यांनी सन २०१८ च्या रामलीला मैदानावरील व सन २०१९ च्या राळेगणसिद्धीतील उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी लेखी आश्वासन  दिले होते. परंतु, केंद्र सरकारने आश्वासनाची अमंलबजावणी केली नाही. त्यामुळे स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी यासाठी हजारे यांनी ता. ३० जानेवारीपासून उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता.

हे नेते आहेत सोबत

कृषिमंत्री चौधरी यांच्यासमवेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाबुराव पाचरणे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले आदी उपस्थित आहेत.

गेल्या महिनाभरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार डॉ. भागवत कराड आदींनी हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मनधरणी केली होती.  परंतु चर्चा नको, केंद्र सरकारने ठोस कार्यवाही करावी असे सांगत हजारे हे उपोषणावर ठाम होते.
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT