Govinda Reservation Uday Samant s explanation regarding MPSC student eknath shinde mumbai  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion : ''काही मिळावं यासाठी आमदार शिंदेंसोबत आले नव्हते'' उदय सामंत मंत्रिमंडळ विस्तारावर थेट बोलले

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधून एक ते दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता बोलून दाखवली आहे. त्यानंतर त्यांनी शिंदे गटातल्या आमदारांबाबत एक विधान करुन चर्चा घडवून आणली.

उदय सामंत म्हणाले की, उद्योगरत्न पुरस्कारासंबंधी चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. दोन्ही पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु आहे. मात्र तिन्ही नेते अभ्यासू आणि सर्व परिस्थितीची जाण असणारे आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील.

ते पुढे म्हणाले की, येत्या एक-दोन दिवसांमध्ये खातेवाटप होईल. आम्हांला काही मिळावं, यासाठी शिंदे साहेबांसोबत आमदार आले नव्हते. त्यामुळे कुणामध्येही नाराजी नाही. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल.

अजित पवारांच्या दिल्लीभेटीबद्दल सामंत म्हणाले, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर शाह यांची भेट त्यांनी घेतली नव्हती. त्यामुळे कालची भेट झाली. मात्र सध्या तथ्य नसलेल्या बातम्या समोर येत आहेत.

बच्चू कडू यांच्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, बच्चू कडू यांनी मनातील खदखद बाहेर काढली असली तरी मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलले आहेत. १७ तारखेला ते पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटणार असून सविस्तर चर्चा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT