महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: 'आयुर्वेदातील संशोधनानेच होईल जगाचे कल्याण', नितीन गडकरी यांनी दर्शवला विश्वास

आपल्याकडे असलेल्या आयुर्वेदातील ज्ञानाला नवसंशोधनाची जोड दिल्यास जगाचे कल्याण होईल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयुर्वेदाचे महत्त्व व भविष्य विषद केले.

सकाळ डिजिटल टीम

Nitin Gadkari On Ayurveda: ९ आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली एक अनुपम देणगी आहे. आज जगभरात आयुर्वेदाला प्रचंड मागणी आहे. आपल्याकडे असलेल्या आयुर्वेदातील ज्ञानाला नवसंशोधनाची जोड दिल्यास जगाचे कल्याण होईल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयुर्वेदाचे महत्त्व व भविष्य विषद केले. निमित्त होते प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मालविका तांबे व संतुलन आयुर्वेदचे प्रमुख श्री. सुनील तांबे यांच्याशी चर्चेचे.

जगातील एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ श्रीगुरू बालाजी तांबे यांनी आपल्या संशोधनातून या क्षेत्रात मोलाची भर घातली. डॉ. बालाजी तांबे यांचे मार्गदर्शन व वारसा लाभलेल्या डॉ. मालविका तांबे व श्री. सुनील तांबे यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयुर्वेदाची बलस्थाने नव्या संधी आणि आव्हाने यावरही सविस्तर चर्चा झाली.

नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत करताना संतुलन आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे व प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मालविका तांबे. यावेळी आयुर्वेदाचे महत्व, संधी व आव्हाने या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.(Latest Marathi News)

पुण्याजवळच्या कार्ला येथील संतुलन आयुर्वेदला आता चाळीस वर्षे झाली आहेत. यावेळी नितीन गडकरी यांनी डॉ. बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदातील मोठ्या योगदानाचा विशेषत्वाने उल्लेख केला. आजच्या जीवनशैलीने उद्भवणाऱ्या आजारांसोबतच एकूणच आरोग्य रक्षणासाठी आयुर्वेद हा सर्वोत्तम उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुर्वेदातील चांगल्या गोष्टींना अधिक बळ देण्याची गरज आहे. आयुर्वेद क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आता पारंपरिक ज्ञान व नवसंशोधन याच्या योग्य समन्वयातून नवनिर्मिती करावी. या नवसंशोधनातून साकारलेल्या औषधांमुळे रुग्णांना

लवकर फायदा झाल्यास आयुर्वेदाचा अधिक झपाट्याने प्रचार-प्रसार होईल व जगभरातील जनतेचे कल्याण होईल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. यावेळी कांचन गडकरी यांनी मोठे आदरतिथ्य केले आणि आयुर्वेद महत्त्वाचा असल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT