15 वर्षांचा प्रदीर्घ लढा; पत्रकार मुलीला न्याय मिळवून दिल्यानंतरच वडिलांनी ठेवला देह!

Days after journalist Soumya Vishwanathan killers were sentenced to life imprisonment her father MK Vishwanathan passed away knp94
Days after journalist Soumya Vishwanathan killers were sentenced to life imprisonment her father MK Vishwanathan passed away knp94

नवी दिल्ली- काही दिवसांपूर्वी पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झाली होती. त्यानंतर शनिवारी रात्री सौम्या यांचे वडील एमके विश्वनाथन यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Days after journalist Soumya Vishwanathan killers were sentenced to life imprisonment her father MK Vishwanathan passed away)

२५ नोव्हेंबर रोजी सौम्या यांच्या हत्याकांडात आरोपी असणाऱ्यांना पाच जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांना दुहेरी मृत्यूदंडाशी शिक्षा सुनावण्यात आली होती. सौम्यांच्या ८२ वर्षीय वडिलांना सुनावणी सुरु होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Days after journalist Soumya Vishwanathan killers were sentenced to life imprisonment her father MK Vishwanathan passed away knp94
Soumya Viswanathan Murder Case: पत्रकार सौम्या हत्याकांडात शिक्षा जाहीर! चार आरोपींना दुहेरी जन्मठेप

सौम्या यांच्या हत्येसाठी दोषी असणाऱ्या ५ जणांना शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी कोर्टाची ऑनलाईन सुनावणी एमके विश्ननाथन यांना रुग्णालयातून दाखवण्यात आली होती. त्यांनी आयसीयूमधून ही सुनावणी पाहिली. त्यांनी सुनावणी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सौम्या पत्रकार हत्याकांड

२६ वर्षीय पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची २००८ मध्ये चोरीच्या उद्देशाने हत्या झाली होती. त्यानंतर त्यांचे वडील एमके विश्वनाथन आणि आई माधवी विश्वनाथन यांनी एक दीर्घ कायदेशीर लढाई लढली. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. अखेर जवळपास १५ वर्षांनी त्यांच्या संघर्षाला यश मिळाले. लढा जिंकल्यानंतर त्यांनी आपला देह ठेवला अशी चर्चा सुरु झालीये.

Days after journalist Soumya Vishwanathan killers were sentenced to life imprisonment her father MK Vishwanathan passed away knp94
15 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा... पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येप्रकरणी 5 जण दोषी; दिल्ली न्यायालयाचा निर्णय

१५ वर्षाच्या सुनावणीमध्ये मध्ये एमके विश्वनाथन यांनी जवळपास प्रत्येक सुनावणीला हजेरी लावली. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास केला. तब्येत साथ देत नसताना त्यांनी कधी निवांतपणा उपभोगला नाही. कोर्टरुममध्ये ते काठीच्या साहाय्याने चालत यायचे. आपल्या मुलीला न्याय मिळावा ही एकच इच्छा त्यांनी आपल्या मनात बाळगली होती.

पाच दोषींना कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर विश्वनाथन यांनी समाधान व्यक्त केले होते. पण, न्याय मिळण्यासाठी लागलेला वेळ आणि प्रशासकीय प्रक्रियेमध्ये अडचणींबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं. दरम्यान, मुलीला डोळ्यासमोर न्याय मिळाल्याचं पाहूनच त्यांनी अखेरचा श्वास घेतला असं बोललं जातंय. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com