Ravindra Waikar sakal media
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : ठाकरे गटातील आमदाराला मोठा धक्का! रवींद्र वायकर यांच्यासह पत्नीवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

रोहित कणसे

शिवसेनेचे दोन्ही गट एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी कालपासून सुरू झाली.या सुनावणीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे पाहयाला मिळत आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर , त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार असून आमदार वायकर यांनी जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेत तिथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यांसंबंधीचे आरोप केले होते.

त्यानंतर आमदार रवींद्र वायकर यांच्या हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केल्यानंतर मुंबई महानगरपालिके त्या बांधकामाची परवानगी नाकारत कामाला स्थगिती दिली.त्यानंतर वायकरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण त्यांना दिलासा मिळाला नाही.

दरम्यान आता वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरोधातआर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून लवकरच या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT