Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून बोलावणं; 'या' मुद्द्यांवर होणार सुनावणी

Sharad pawar vs Ajit pawar
Sharad pawar vs Ajit pawarEsakal
Updated on

मुंबईः अजित पवार यांनी २ जुलै रोजी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्याकडे शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचं संख्याबळ असल्याचं दिसून येत आहे. दोन्ही गटांनी पक्ष आमचाच असल्याचा दावा केलाय.

जे शिवसेनेमध्ये झालं तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे. चिन्ह आणि पक्षावरुन वाद निर्माण झाला आहे. नुकतच शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलेलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय. शिवाय पदाधिकारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचं उत्तरामध्ये म्हटलंय.

Sharad pawar vs Ajit pawar
Ajit Pawar : आरोग्य विभागात मोठी भरती! नवीन रुग्णालयांना मंजुरी अन् पदभरतीसंदर्भात अजित पवारांचे निर्देश

त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलावलं आहे. ही सुनावणी पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत होणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला यासंदर्भात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये काय निर्णय होतो, हे पाहावं लागेल. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट मैदानात उतरले आहेत. जिथे शरद पवार सभा घेत आहेत तिथेच अजित पवार गटाच्या सभा होत आहेत. बीड, कोल्हापूरमध्ये दोन्ही गटांच्या सभा झालेल्या आहेत.

Sharad pawar vs Ajit pawar
Teacher Recruitment : शिक्षक भरतीत ‘स्व-प्रमाणपत्र’ पूर्ण करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सध्यातरी आमदारांचं संख्याबळ अजित पवार यांच्या गटाकडे असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेप्रमाणे आयोगाने निर्णय घ्यायचं ठरवलं तर अजित पवारांना घड्याळ चिन्ह मिळू शकतं. परंतु आयोग कोणत्या गटाचे पुरावे ग्राह्य धरणार, हे येत्या काळामध्ये दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com