chandrakant patil 
महाराष्ट्र बातम्या

मी बसल्या बसल्या अजित पवारांना चिठ्ठी लिहिली, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी संघटना अद्याप विलीनीकरणावर ठाम आहेत. राज्य सरकारने गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल नुकताच मंजूर झाला. त्यामुळे विलीनीकरणाचा विषय मार्गी लागणं अशक्य झालंय. अजित पवारांनी पुन्हा ३१ मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. (Chandrakant Patil Writes Letter To Ajit Pawar Over ST Worker Strike)

यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एसटी कामगारांच्या प्रकरणावरून अजित पवारांवर विश्वास दाखवला आहे. अजित पवार यांच्यात हा प्रश्न मार्गी लावण्याची धमक आहे, असं पाटील म्हणाले. मी परवा सभागृहात बसल्या बसल्या अजित पवारांना पत्र लिहिलं. त्यांना पुन्हा एसटीच्या विषयात लक्ष्य घालण्यासाठी सुचवल्याचं पाटील म्हणाले. (Chandrakant Patil)

माझे वडील गिरणी कामगार होते. कामगारांचे प्रश्न मी जवळून पाहिले आहेत. गिरणी कामगार नेते दत्ता सामंतांच्या संपात एक लाख घरे उध्वस्त झाली. अजित दादांनी लक्ष्य घालून हा प्रश्न मार्गी लावावा, असं पाटील म्हणाले. अजित दादांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकावी.

त्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत घालून सर्व मगण्या मान्य कराव्या. दादांचं लोक ऐकतात, असं पाटील म्हणाले. दादांना हो र हो नाही तर नाही म्हणता येतं. बाकीचे हेकट आहेत. त्यामुळे अजित पवारांनीच एसटी संप मिटवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात जनता वसाहतीत कोयत्याने गाड्यांची तोडफोड; परिसरात दहशतीचे वातावरण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT