सामना वाचणं बंद केलं, राऊतांवर बोलणं बंद केलं - चंद्रकांत पाटील

वारंवार माझी चेष्टा करणं राऊतांना एकदिवस महागात पडणार - चंद्रकात पाटील
Political
Politicalesakal
Updated on
Summary

वारंवार माझी चेष्टा करणं राऊतांना एकदिवस महागात पडणार - चंद्रकात पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अग्रलेखातून भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदी 22 तास काम करतात. उरलेले दोन तास झोपही पंतप्रधानांना येऊ नये यावर संशोधन सुरू आहे.' चमच्यांचे हे विधान ऐकून पंतप्रधान मोदींची (PM Modi) दोन तासांची झोपही उडाली असेल!, असा टोमणा राऊत यांनी लगावला आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून (BJP) प्रतिक्रिया येत आहेत. राऊत माझी वारंवार चेष्टा करतात, त्यांनी ही चेष्टा महागात पडणार आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. सामना वाचणं बंद केलं, राऊतांवर बोलणं बंद केलं, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

Political
'पवारांच्या घरचं वातावरण पुरोगामी, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहूदे'

राऊतांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले, मी सामना वाचणं आणि राऊतांवर बोलणं बंद केलं आहे. राऊतांना माझी चेष्टा करणं महागात पडणार आहे. महाविकास आघाडीचे महान नेते कोणतेही आरोप करुदेत काही फरक पडत नाही. कारण केंद्रीय तापस यंत्रणांची स्वायत्ता आहे. त्यांचे अधिकार ते वापरु शकतात. सत्ताधारी पक्षातील काहीजण जात्यात आहेत तर काहीजण सुपात, जात्यात गेलेल्यांच पीठ झालं आहे. काहीजण अजून जात्यात जाणार आहेत, असं सूचक विधानाही त्यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी सांगलीतील आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकापर्ण सोहळ्यावरही भाष्य केलं. याशिवाय एसटीचा संप (ST Strike) संपवायचा असेल तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Political
मलिक तो महान, बस चमचों से..; राऊतांचा पाटलांना टोला

अग्रलेखात काय म्हणाले आहेत राऊत

चंद्रकांत पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवीत सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात व फक्त दोन तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पाटलांची ही विधाने ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना हे इतके मानसिक बळ येते कोठून, हाच संशोधनाचा विषय आहे. काँग्रेसच्या (Congress) काळात दिल्लीपासून सर्वत्र चमच्यांची चलती होती. मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली, पण काम तेच आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com