Chargesheet filed by Khar police against Rana couple Chargesheet filed by Khar police against Rana couple
महाराष्ट्र बातम्या

राणा दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पुढील सुनावणी १६ जून रोजी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील खाजगी निवासस्थानाबाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे खासदार नवनीत राणा (navneet Rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) म्हणाले होते. २३ एप्रिल रोजी अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप राणा दाम्पत्यावर आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी बुधवारी (ता. ८) राणा दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल (Chargesheet filed) केले आहे. (Chargesheet filed by Khar police against Rana couple)

राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहिताच्या कलम ३५३ (लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी बळाचा वापर) आणि ३४ (सामान्य हेतूने पुढे जाण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेले कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध बोरिवली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जून निश्चित करण्यात आली आहे.

राणा दाम्पत्यावर (ravi rana) सार्वजनिक सेवकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. बुधवारी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येत असल्याची नोटीस दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती, असे खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन माने यांनी सांगितले.

८५ पानांच्या आरोपपत्रात २३ साक्षीदारांचे जबाब आहेत. जे २३ एप्रिल रोजी त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये त्यांच्या अटकेला विरोध करीत असताना गोंधळ घातला तेव्हा उपस्थित होते, असे दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

२३ एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला सांप्रदायिक सलोखा निर्माण करण्याचा आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे कारण देत त्यांनी योजना रद्द केली होती. यावेळी पोलिसांनी कलम १२४-ए (देशद्रोह) या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. राणा दाम्पत्याला ४ मे रोजी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT