नूपुर शर्माची जीभ कापणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस; भीम सेनेची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nupur Sharmas tongue cutter gets Rs 1 crore reward

नूपुर शर्माची जीभ कापणाऱ्याला मिळणार १ कोटी; भीम सेनेची घोषणा

गुरुग्राम : भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे उठलेले वादंग अद्याप शांत झालेले नाही. आता या वादात भीम सेनेनेही उडी घेतली आहे. नूपुर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला एक कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा भीम सेनेचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी बुधवारी (ता. ८) केली. कानपूर हिंसाचाराची सूत्रधार नूपुर शर्मा असल्याचा आरोप भीम सेनेने (Bhim Sena) केला आहे.

नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी पैगंबराचा अपमान केला आहे. ज्यामुळे करोडो मुस्लिम समाज दुखावला गेला आहे. मोदी सरकार मुद्दाम नूपुर शर्माला अटक करीत नाही आहे. नूपुर शर्मा ही कानपूर दंगलीची खरी सूत्रधार आहे. योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही, असा सवाल भीम सेनेचे (Bhim Army) संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी केला.

हेही वाचा: सिद्धू मुसेवाला हत्याकांड : पुण्यातील सौरव महाकाळला अटक

नुकतेच एका टीव्ही चर्चेदरम्यान नूपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. चौफेर दबावानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. अनेक कट्टरवादी नूपुर शर्मा यांना धमक्याही देत ​​आहेत. वाढलेला धोका पाहता दिल्ली पोलिसांनी नूपुर शर्मा यांना सुरक्षा पुरवली आहे.

जगभर भारताची बदनामी

नूपुर शर्मासारख्या (Nupur Sharma) नेत्याला समाजात राहण्याचा अधिकार नाही. त्यांना तात्काळ तुरुंगात पाठवावे किंवा देशाबाहेर हाकलून द्यावे. नूपुर शर्मा यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जगभर भारताची बदनामी होत आहे, असेही सतपाल तंवर म्हणाले.

Web Title: Nupur Sharmas Tongue Cutter Gets Rs 1 Crore Reward Announcement Of Bhim Army

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AnnouncementBhim Army
go to top