Chhagan Bhujbal 
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: "मला गोळी मारली जाईल"; छगन भुजबळांचा विधानसभेत मोठा दावा, पोलिसांचा दाखवला रिपोर्ट

Sandip Kapde

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मोठा दावा केला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवशेन सुरु आहे. अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. आज छगन भुजबळ यांनी आज मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे.

मला गोळी मारली जाईल, असा पोलिसांचा रिपोर्ट आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. यावेळी भुजबळांनी विधानसभेत रिपोर्ट देखील दाखवला. यामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

छगन भुजबळ म्हणाले, मला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. मी आता भुजबळांचा कार्यक्रम करतो, असे जरांगे पाटील म्हणाले. अचानक आपली पोलीस सुरक्षा वाढवली, वरुन इनपूट आहे.

एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळांचा कार्यक्रम करतो, असे जरांगे म्हणाल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला. भुजबळ म्हणाले माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु झाली आहे. प्रकाश सोळुंखेंच झालं. संदीप क्षिरसागर यांचं देखील झालं. माझ सुद्धा होइल, असे छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

कालपासून पोलसांची सुरक्षा वाढली. मी विचारलं तर मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. मारा हरकत नाही, पण हे जे सुरु आहे. हे बरोबर नाही मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या पण ही झुंडशाही थांबवा, असे भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT