Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. राज्याच्या राजकारणात मागील दोन-तीन दिवसांपासून घडामोडींना वेग आल्याने मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे राजकीय अर्थाने बघितलं जात आहे.

मुख्यमंत्री राज्यबाल बैस यांच्या भेटीला राजभवनात दाखल झाले आहेत. 'टीव्ही ९' ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या भेटीचं कारण अस्पष्ट आहे. दोघांमध्ये महत्वाची बैठक होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात सुरु असलेलं राजकारणावर चर्चा होऊ शकते.

दरम्यान, राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बैठक पूर्वनियोजित नव्हती. मुख्यमंत्री अचनाक राजभवनावर गेल्याची माहिती असून ही भेट स्नेहभोजनानिमित्त असल्याचंही बोललं जातंय.

मुख्यमंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीचा नेमका अर्थ काय? नेमकं आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला का गेले? याचे निरनिराळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे मागच्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळ्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पक्षातलं महत्त्व अधोरेखित करणं, अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांना खिळ लावणे यासह बरेच अर्थ काढले जात आहेत.

त्यामुळे आज अचानकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय उलथापालथ होऊ शकते, असं राजकीय जाणकार सांगत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही भेट आधीच ठरल्याचं शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT