Chitra Wagh reply on notice of Women Commission 
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh : "खुल्या समाजात उघडा नंगानाच..." ; महिला आयोगाच्या नोटिशीवर चित्रा वाघ यांचे जाहीर उत्तर

Sandip Kapde

Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणावरुन महिला आयोग आणि भाजप नेत्या चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर कारवाई प्रकरणी महिला आयोगावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीला चित्रा वाघ यांनी जाहीर उत्तर दिले आहे. (Chitra Wagh reply on notice of Women Commission)

चित्रा वाघ म्हणाल्या, "खुल्या समाजात उघडा नंगानाच, सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार. आपण समाजाचं देणं लागतो, हे कोणीही कधीही विसरू नये. कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव राखून टिकवायची असते. कर्तृत्व हे शाब्दिक नाही तर कृतीनेच असायला हवं."

"महिला आयोगाचा कायम सन्मान करतो. मी नोटिशीचं उत्तर दिलं आहे. मला नोटीस दिली हे जसं जाहीर सांगितलं. दिलेली नोटीस वितरित केली. तसंच हे उत्तरही सार्वजनिक करायला माझी काहीच हरकत नाही. स्वैराचाराला लगाम घालणं, ही फक्त माझीच जबाबदारी नाही तर कायद्यानं स्थापित झालेल्या महिला आयोगाचीही आहेच. माझा लढा सुरूच राहणार," असे चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, महिला आयोगाच्या आम्ही विरोधात नाही. खूप महिलांनी आयोगात काम केले आहे. चित्रा वाघ आयोगावर आता आल्या आहेत. आम्ही आयोगावर काम करुन पुढे आलो आहोत. त्यामुळे आयोग काय काम करते, हे आम्हाला चांगल्याप्रकारे माहित आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यांच्या कार्यपद्धतीवर आमचा विश्वास आहे. अशा ५६ नोटीस मला रोज येतात. त्यात विशेष काही नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

लोक मला आजही शिव्या देतात... अनाजी पंत साकारल्यानंतर महेश कोकाटेंनी व्यक्त केली खंत; म्हणतात-

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

SCROLL FOR NEXT