Eknath Shinde Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंचा अजित पवारांना दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती

अजित पवार निधी देत नसल्याची तक्रार अनेक बंडखोर आमदारांनी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

सत्तेत आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी आणि अजित पवारांना चांगलाच दणका दिला आहे. शिंदेंनी नगरविकास विभागाच्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये बारामती नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता. (Cm Eknath Shinde)

सध्या राज्याचं कामकाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याच हाताखालून होत आहे. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विभागांना मंत्री मिळालेले नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी नगरविकास विभागाच्या मार्च ते जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. यातही महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी अभय दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार (Ajit Pawar) निधी देत नाहीत, अशी तक्रार अनेक आमदारांनी केली होती. त्यानंतर आता शिंदेंनी सत्तेत आल्यावर हे बदल केलेलं दिसत आहे. दरम्यान, ९४१ कोटींपैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला २४५ कोटींचं वितरण कऱण्यात आलं होतं. मात्र आता बारामतीतल्या कामांना स्थगिती मिळाल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT