Eknath Shinde on narayan rane esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : ''ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांच्यासाठी कालचा निर्णय'', राणेंच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

मराठा आरक्षणाचा काल घेतलेला निर्णय हा, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांच्यासाठी घेतला गेलेला आहे. जे पारंपारिक आरक्षण देण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग काम करतंय.. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत रविवारी एक विधान केलेलं आहे. मराठा आरक्षणाचा काल घेतलेला निर्णय हा, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांच्यासाठी घेतला गेलेला आहे. जे पारंपारिक आरक्षण देण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग काम करतंय.. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारने सगेसोयऱ्यांच्या बाबतीत काढलेली अधिसूचना आपल्याला मान्य नसून आपण सरकारच्या निर्णयाशी असहमत आहोत, असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मुद्दा स्पष्ट केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, नारायण राणे म्हणत आहेत ते पारंपारिक मराठा आरक्षण वेगळं आणि काल घेतलेला निर्णय वेगळा. कालचं नोटिफिकेशन हे कुणबी नोंदींच्या संदर्भाने आहे. ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत त्यांच्यासाठी कालचा निर्णय घेतलेला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ब्लड रिलेशनमधल्या वंशावळीमधील लोकांसाठी सरकारने काल निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय होणार आहे, त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग काम करत आहे. चार लाख लोकं तीन शिफ्टमध्ये ३६ जिल्ह्यांत काम करताहेत. त्यामुळे विशेष अधिवेशन घेऊन तो निर्णय घेतला जाईल.

नारायण राणेंचं ट्वीट

मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: 'धुरंधर नेते, आधुनिक चाणक्य'; देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रवादी नेत्याचे खास बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT