Nitish Kumar News: बिहारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा?

Samrat Choudhary Vijay Sinha to be Bihar Deputy Chief Ministers: नव्या सरकारमध्ये भाजपने दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
 Samrat Choudhary Vijay Sinha to be Bihar Deputy Chief Ministers
Samrat Choudhary Vijay Sinha to be Bihar Deputy Chief Ministers

नवी दिल्ली- बिहारमध्ये आज राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनाचा दावा केला आहे. त्यांना भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला आहे. आज सायंकाळी पाच वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Nitish Kumar News)

नव्या सरकारमध्ये भाजपने दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपने या दोन नेत्यांना संधी देण्यामध्ये जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही नेत्यांबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया.(BJP Samrat Choudhary Vijay Sinha to be Bihar Deputy Chief Ministers in nitish kumar government know about them)

 Samrat Choudhary Vijay Sinha to be Bihar Deputy Chief Ministers
Nitish Kumar Resigned: नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपकडून पाठिंबा

सम्राट चौधरी कोण आहेत?

53 वर्षांचे सम्राट चौधरी हे शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. शकुनी चौधरी हे समता पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते. तसेच ते अनेकवेळा आमदार-खासदार राहिले आहेत. त्यांचे नाव कुशवाह समाजाच्या बड्या नेत्यांमध्ये घेतलं जातं. सम्राट चौधरी यांनी आपली राजकीय कारकीर्द १९९० मध्ये आरजेडीसोबत केली होती. १९९९ मध्ये राबडी देवी सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. पण, त्यांच्या कमी वयामुळे वाद निर्माण झाला होता.

सम्राट चौधरी २००० आणि २०१० मध्ये परबत्ता विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. २०१४ मध्ये ते नगर विकास मंत्री होते. २०१८ मध्ये त्यांनी आरजेडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. ते एनडीएमध्ये पंचायती राज मंत्री होते.

 Samrat Choudhary Vijay Sinha to be Bihar Deputy Chief Ministers
Nitish Kumar News : नितीश कुमार पुन्हा NDAमध्ये परतले तर फायदा कोणाला? जाणून घ्या सविस्तर

विजय सिन्हा कोण आहेत?

विजय सिन्हा बिहार राजनीतीमध्ये चर्चीत चेहरे आहेत. ते लखीसराय मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक जिंकले आहेत. २००० मध्ये विजय सिन्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश संघटनेचे प्रभारी बनले होते. २००४ मध्ये ते प्रदेश कार्य समिती सदस्य होते. त्यांना भाजपने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

२००५ मध्ये विजय सिन्हा पहिल्यांदा लखीसरायमधून आमदार झाले. पण, सहा महिन्यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. त्याच वर्षी पुन्हा झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१० मध्ये त्यांचा पुन्हा विजय झाला. त्यानंतर ते सलग विजयी होत आहेत.

नितीश कुमार सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. २०१७ मध्ये जेव्हा नितीश कुमार भाजपसोबत आले तेव्हा विजय सिन्हा श्रम संसाधन मंत्री होते. भाजपचे विश्वासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. भूमिहार समूदायाचे नेते आणि आरएसएसची पार्श्वभूमीवर असलेले विजय सिन्हा यांचा जन्म लखीसरायच्या तिलकपूरमध्ये ५ जून १९६७ रोजी झाला होता. वयाच्या तेराव्या वर्षी ते आरएसएसशी जोडले गेले होते. इंजिनिअरिंग सोडून त्यांनी राजकारणाला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला होता. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com