Maratha Reservation Manoj Jarange-Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मनोज जरांगेंना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही, राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार?

मनोज जरांगे पाटील २६ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरूवात करणार आहेत.

रोहित कणसे

Maratha Reservation Case : मराठा आरक्षणासाठी राज्यात मागील बऱ्याच दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. याचा पुढील टप्पा म्हणजे मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा समर्थकांसह २० जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.

तसेच २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं जाणार आहे. मात्र जरांगे पाटील हे मुंबईत धडकण्यापूर्वीच मराठा आरक्षणावर तोडगा काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साम टीव्हीने सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मनोज जरंगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही. कारण राज्य सरकारकडून जरंगे यांची समजूत काढण्यासठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनोज जरांगे य यांच्या आंदोलनावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तसेच मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबई देण्याची वेळ येणार नाही. राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार अशी माहिती देण्यात आली आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी त्यांची सरकारकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश असलेल्या एका शिष्ठमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.

सरकारचा नवा ड्राफ्ट घेऊन दोघेही छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT