Thackeray Vs Shinde: दोन्ही गट पुन्हा कोर्टात! ठाकरेंची वकिलांसोबत ४ तास बैठक; नार्वेकरांच्या निकालाची आज होणार चिरफाड

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर विरोधकांकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कोर्टाचे दार ठोठावले आहे
shinde vs thackeray case rahul narvekar
shinde vs thackeray case rahul narvekarEsakal

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर विरोधकांकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर या निकालाविरोधात ठाकरे गटाने पुन्हा कोर्टाचे दार ठोठावले आहे. नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान या निकालाची ठाकरे पत्रकार परिषद घेत चिरफाड देखील करणार आहेत. यापूर्वी काल रात्री ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठाकरे गटाची चार तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांची वकिलांसोब ग्रँड हयात हॉटेलात ही बैठक झाली. काल रात्री साडेआठ ते १२ वाजून ४० मिनीटं इतका वेळ ही बैठक झाली. आज उद्धव ठाकरे यांची चार वाजता पत्रकार परिषद असणार आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेला आमदार अपात्रतेच्या निर्णयासंबंधी ही पत्रकार परिषद असणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून निकालची चिरफाड करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे गटाची तब्बल चार तास बैठक झाली आहे. टीव्ही ९ मराठीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांची ही महा पत्रकार परिषद असेल असे सांगितले जात आहे. तसेच यासाठी जनता देखील समोर असणार असून राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. या सगळयाची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे घेणार आहेत असे संजय राऊत यांनी सांगितले होते. दरम्यान आज चार वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय मुद्दे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

shinde vs thackeray case rahul narvekar
Thackeray Vs Narvekar: अजून खेळ संपलेला नाही! नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी निकाला देताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा शिवसेनेच्या दोन्ही गटांना पात्र ठरवलं. यानंतर त्याच दिवशीच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत घेत नार्वेकरांचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचा अवमान करणारा आहे. त्यामुळं आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ पण स्वतः कोर्टानच जर या निकालाची दखल घेऊन सुओमोटो दाखल करुन घ्यावी असे म्हटले होते. मात्र अपेक्षेप्रमाणं कोर्टानं या निकालाची दाखल न घेतल्यानं अखेर ठाकरे गटानंच याचिका दाखल केली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन स्वरुपात उद्धव ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं देखील या याचिकेची नोंद घेतली आहे.

shinde vs thackeray case rahul narvekar
Sakal Podcast : मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं

तर शिंदे गट हायकोर्टात

एकनाथ शिंदे गटाने देखील मुंबई हायकोर्टात धाव घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यांना अपात्र का केलं नाही, असा सवाल त्यांनी याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.

भरत गोगावले यांनी अधिवक्ता चिराग शहा आणि उत्सव त्रिवेदी यांच्यामार्फत दाखल केलेल्या रिट याचिकांमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाने याचिकेत म्हटलं की, ठाकरे गटाच्या आमदारांनी स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमदारांसोबत झालेल्या भांडणात शिंदे सरकारच्या विरोधात विश्वासदर्शक ठरावात मतदान केलं म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. या याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणीची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com