Congress nana patole says investigation started on sameer Wankhede after he met rss chief Mohan Bhagwat  SAKAL
महाराष्ट्र बातम्या

Sameer Wankhede : मोहन भागवतांच्या भेटीनंतरच वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा; 'त्या' दाव्याने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू असलेले एनसीबीचे माजी आधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतरच समीर वानखेडे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचा काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले आहेत.

यामध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे देखील पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Nana Patole On Sameer Wankhede)

नाना पटोले म्हणाले की, समीर वानखेडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात जाऊन आले. तेथे त्यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. याची कारणं काय आहेत? या गोष्टी जेव्हा पुढे येतील तेव्हा यामध्ये काहीतरी लपलेलं आहे हे समोर येईल.

यामध्ये काहीतरी संशयास्पद आहे. समीर वानखेडे यांच्याकडे अशा काही वस्तू आहेत ज्यामुळे संघाची आणि भाजपची पोलखोल होवू शकते असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान एनसीबीचे माजी अधिकारी यांच्या सुनावणीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टानं वानखेडे यांना दिलासा दिला आहे. मुंबई कोर्टानं वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांना ८ जुन पर्यत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. या सगळ्यात कोर्टानं काही अटी वानखेडे यांच्यासमोर ठेवल्या आहेत. त्या म्हणजे त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हाट्स अप चॅट व्हायरल करता येणार नाही. यापूर्वी समीर वानखेडे यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्यांच्यातील चॅट हे व्हायरल केल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर कोर्टानं त्यांना समज दिली आहे.

समीर वानखेडे यांनी त्यांच्याकरिता पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. आपल्याला सोशल मीडियावरुन जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संरक्षण मिळावे, अशी मागणी वानखेडे यांनी कोर्टाकडे केली आहे. यापूर्वी वानखेडे यांनी माध्यमांना आर्यन खान केस प्रकरणातील काही गोष्टी शेयर केल्या होत्या. त्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT