Rajiv Satav 
महाराष्ट्र बातम्या

देशातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज राजीव सातव यांना वाहणार श्रध्दांजली

राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने बुधवार (ता. 19) ला सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी स्वर्गीय अॅड. राजीव सातव (Late Rjiv satav) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने बुधवार (ता. 19) ला ऑनलाईन सभेचे (online ) आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने बुधवार (ता. 19) ला सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत असलेल्या सोशल मीडियाच्या युट्युब फेसबुक ट्विटरवरून ही ऑनलाईन श्रद्धांजली सभा प्रक्षेपित होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या ऑनलाइन श्रद्धांजली कार्यक्रमात पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आजाद, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे खासदार, मंत्री, आमदार या ऑनलाइन श्रद्धांजली सभेत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - चोरीच्या आठ दुचाकी जप्त; दोघांना अटक- हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ही सभा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे काँग्रेस पक्षाच्या अधिकृत असलेल्या असलेल्या सोशल मीडियाच्या संकेतस्थळावरुन थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे व जिल्हा प्रवक्ता विलास गोरे यांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

Hospital Fire: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूने भंडाऱ्याची ‘ती’ काळरात्र पुन्हा ताजी; २०२१ मध्ये १० बालकांचा आगीत मृत्यू

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

SCROLL FOR NEXT