चोरीच्या आठ दुचाकी जप्त; दोघांना अटक- हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या दुचाकी चोरी संदर्भाने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी चोरट्यांचा शोध घेवुन अटक करण्यासंदर्भाने पोलिस निरिक्षक उदय खंडेराय यांना सुचना दिल्याने पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे यांचे एक पथक गठीत करुन रवाना केले.
हिंगोली पोलिस कारवाई
हिंगोली पोलिस कारवाई

हिंगोली : हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने दोन (hingoli police) आरोपीतांसह नांदेड, पुसद, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील चोरीच्या आठ दुचाकी (motorcycle theft arest)जप्त केल्याची माहिती मंगळवारी (ता. १८) स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली. (Eight stolen bikes seized; Both arrested- Hingoli Local Crime Branch action)

हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या दुचाकी चोरी संदर्भाने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी चोरट्यांचा शोध घेवुन अटक करण्यासंदर्भाने पोलिस निरिक्षक उदय खंडेराय यांना सुचना दिल्याने पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे यांचे एक पथक गठीत करुन रवाना केले. पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दुचाकी चोरी संदर्भाने सराईत चोरटा बजरंग व्यवहारे रा. शास्त्रीनगर कळमनूरी आणि गजानन सुर्यवंशी रा. शेंबाळपिंप्री ता. पुसद यांनी हिंगोलीसह वाशिम, नांदेड, यवतमाळ या शहरातून दुचाकी चोरुन विक्री करण्यासाठी कळमनूरी येथे बजरंग उर्फ आकाश व्यवहारे याचे घरासमोरील अंगणात ठेवल्या आहेत. या माहीतीवरुन पथकाने बजरंग व्यवहारे याच्या घरावर छापा मारला असता तेथे विविध कंपन्यांच्या आठ दुचाकी आढळून आल्या. पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त केल्या.

हेही वाचा - नांदेड : देविदास पवारचे मारेकरी अद्याप फरारच; जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराचे कृत्य

सदर दुचाकी मूळ मालकांची प्रादेशीक परिवहन कार्यालयाकडून माहिती घेतली असता अनुक्रमे सदरच्या दुचाकी ह्या सुरेश पुलटे रा. बोरी खुर्द ता. पुसद, सय्यद जावेद सय्यद मोईन रा. आईना महल टेकडी इतवारा नांदेड, राजेश मोदी रा. नंदीग्राम मार्केट वजीराबाद नांदेड, शेख अनवर शेख हबीब रा. इंदीरागांधी वार्ड उमरखेड, मोहन भातकंडे रा. मुचंडी ता. बेळगाव (राज्य कनार्टक) व इतर तीन दुचाकी मालकाची माहीती मिळू शकली नाही. दोन्ही चोरट्यांकडे वरील जप्त आठ दुचाकीच्या मालकी हक्काबाबत व कागदपत्राबाबत विचारपूस केली असता सदर आरोपीतांनी ह्या चोरीच्या असल्याबाबत सांगितले.

या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरुन बजरंग व्यवहारे व गजानन सुर्यवंशी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसांब घेवारे, के. डी. पोटे, अंमलदार बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, सुनिल अंभोरे, विठ्ठल कोळेकर, शंकर ठोंबरे, विशाल घोळवे, राजु ठाकुर, किशोर सावंत, दिपक पाटील, ज्ञानेश्वर पायघन व चालक प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com