Shivjayanti sakal media
महाराष्ट्र बातम्या

तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती संदर्भात काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरवर्षी मोठ्या उत्साहात 19 फेब्रुवारी रोजी शासनाच्यावतीने शिवजयंती साजरी केली जाते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दरवर्षी मोठ्या उत्साहात 19 फेब्रुवारी रोजी शासनाच्यावतीने शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी केली जाते. तसेच काही शिवप्रेमी तिथीनुसार म्हणजेच 19 मार्च रोजीदेखील शिवजयंती साजरी करतात. परंतु, तिथीनुसार (फाल्गुन कृष्ण चतुर्थी) साजरी होणाऱ्या शिवजयंतीबाबत काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी न करता प्रत्येक घरात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Congress Bhai Jagtap Letter To CM Uddhav Thackeray )

भाई जगताप यांनी दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, तिथीनुसार (19 मार्च) साजरी होणारी शिवजयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी न करता प्रत्येक घरात शिवजयंती साजरी करण्याचे, तसेच सणाचे स्वरुप प्राप्त करून देऊन पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा पायंडा पाडण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिवजयंती घराघरात, शिवजयंती मनामनात या उक्तीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवप्रेरणा आपण सर्वजण घेऊया असे त्यांनी म्हटले आहे. तसेच याची सुरुवात मुख्यमंत्री निवास असलेल्या आपल्या वर्षा निवासस्थानापासून करावी असे त्यांनी म्हटले आहे.

यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींसह यात सहभागी होऊन, शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या जनतेला शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनकारी वातावरण निर्माण करून, तिथीनुसार शिवजयंती प्रत्येक घरात साजरी करावी, असे आवाहन करण्याची मागणी भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashedi Ghat Landslide : महामार्गावरील एक मार्गिका तब्बल 14 तास बंद; धामणदेवी-चोळई येथे दरड कोसळली, रस्ता खुला करण्याच्या कामात पावसाचे विघ्न

Pune News: मोठी घडामोड! यशवंत कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला सरकारची पुन्हा स्थगिती, खरेदीखत पूर्ण, तरीही ब्रेक

Latest Marathi News Live Update : मुंबईवरून अंबरनाथला जाणाऱ्या तरुणावर धावत्या लोकलमध्ये कोयत्याने सपासप वार; हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT