Maharashtra Politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : 'त्या' वादग्रस्त मंत्र्यांची वागणूक शिंदेंना भोवणार; मंत्रीमंडळ विस्ताराआधीच भाजपकडून दबाव?

या मंत्र्यांचे मंत्रिपदही जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शिंदे गटातील काही मंत्री फक्त वाचाळवीर असून त्यांच्यावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपचे हायकमांड या मंत्र्यांवर नाराज आहे. या मंत्र्यांच्या वादग्रस्त वागणुकीचा फटका भाजपला बसन असून यामुळे सरकारबरोबर भाजपचीही बदनामी होत असल्याचा निष्कर्ष केंद्री नेतृत्वाने काढला आहे. त्यामुळे या मंत्र्यांचे मंत्रिपदही जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील अनेक नेते मंत्रीपदासाठी उत्सुक होते. पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काही जणांची वागणूक वादग्रस्त ठरली आहे. यामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या कृषी महोत्सवात वर्गणी गोळा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना दिलेले रेट कार्ड आणि टार्गेट हा चर्चेचा विषय ठरला होता.

त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी, बीड येथील अधिकाऱ्याला दारू प्यायची का? अशी केलेली विचारणा, शिक्षक भरती प्रकरण गैरव्यवहारात त्यांच्या मुलींची नावे, मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ओढलेले ताशेरे आणि अलीकडे अकोला येथे टाकलेले धाड प्रकरण यामुळे सत्तार यांच्यावर अनेक स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच इतर चार मंत्रीही कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत आले होते.

येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेक आमदारांचे लक्ष लागले असून या विस्तारासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीच अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून शाह यांनी शिवसेनेतील वादग्रस्त मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकीत फटका बसू नये यासाठी या मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भाजपकडून दबाव आणला जात असल्याची माहिती आहे.

या मंत्र्यांचे नाव चर्चेत

कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड या पाच मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. या पाचही मंत्र्यांची कार्यशैली वादग्रस्त मानली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT