Maharashtra Politics : ठिणगी पडणार? राज्यात CM शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त फेमस! शिवसेनेच्या जाहिरातीने खळबळ

Shiv Sena advertisement says Eknath Shinde more favorite as CM over Devendra Fadnavis Politics news
Shiv Sena advertisement says Eknath Shinde more favorite as CM over Devendra Fadnavis Politics news

राज्यातील सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षात कल्याण डोंबिवली लोकसभेच्या जागेवरून तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान आज, १३ जून रोजी राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशा टॅगलाइन खाली पानभर जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान आता या जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

या जाहिरातील महाराष्ट्राती २६.१ टक्के जनतेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र हवेत तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याचे एका सर्व्हे मध्ये समोर आल्याचे या शिवसेनेच्या जाहिरातीमध्य म्हटले आहे. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंपेक्षा तब्बल तीन टक्के मते कमी मिळाल्याचे सांगण्यात आलं आहे.

इतकेच नाही तर महाराष्ट्रातील जनतेने ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवल्याचे देखील या जाहीरातीमध्ये म्हटले आहे. दरम्यान फडणवीस आणि शिंदे यांची या जाहिरातीमध्ये एकंदरीत तुलना करण्यात आली आहे. दरम्यान या जाहिरातीवरून आता प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Shiv Sena advertisement says Eknath Shinde more favorite as CM over Devendra Fadnavis Politics news
BJP : भाजपचं लोकसभा निवडणुकीत काय होणार? तामिळनाडू ते हरियाणातील सहकारी पक्षात नाराजी

जाहिरातीत अजून काय म्हटलंय?

सपूर्ण पानभर देण्यात आलेल्या या जाहिरातीत दावा केला आहे की, या सर्व्हेमध्ये भाजपला ३०.२ टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप शिवसेनेच्या युतीसोबत असल्याचा दावा देखील जाहिरातीत केला आहे.

Shiv Sena advertisement
Shiv Sena advertisement
Shiv Sena advertisement says Eknath Shinde more favorite as CM over Devendra Fadnavis Politics news
'ते' ओरिजनल फुटेज सापडलंच नाही…; शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांकडून लवकरच आरोपपत्र

भाजपचे म्हणणे काय?

शिवसेनेने ही जाहीरात दिली आहे कालच्या एका वृत्तवाहिनीच्या सर्व्हेच्या आधारावर ही जाहिरात देण्यात आले आहेत असे भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी दिली. काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रांने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला जास्त मतं दाखवली, शिवसेनेला कमी मतं दाखवली. तसेच भाजपला १३० ते १३५ जागा दाखवण्यात आल्या आहेत. सर्व्हेमध्ये भाजप-शिंदे सराकर पुन्हा बहुमताने निवडून येईल हे सांगितलं आहे. त्यामुळे ही जाहिरात दिलेली आहे, असेही भातखळकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केलं आहे की. आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. तसेच ते केंद्रात पुन्हा मोदी येणार आणि त्यासाठीच आम्ही कटीबध्द आहोच असंच जाहिरातीमधून सांगत आहेत. त्यामुळे यामध्ये काही दबावाचा भाग नाही, असेही भातखळकर यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com